सर्वात वर

नाशिक शहरातील काही भागात उद्या कमी प्रमाणात पाणीपुरवठा

 नाशिक- नाशिक महानगर पालिकेच्या मुकणे धरण रॉवॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथुन 33 के.व्ही वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. या  सबस्टेशन मधील विद्युत विषयक कामे करणे करीता उद्या दि.09/03/2021 रोजी दुपारी 01.00 ते दुपारी 3.00 वाजेपावेतो (2 तास ) वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथुन सायंकाळचा होणारा पाणीपुरवठा (Nashik City Water Supply) कमी दाबाने होईल. 

खालील परिसरात पाणी पुरवठा (Nashik City Water Supply) कमी दाबाने व कमी प्रमाणात होईल. 

नवीन  नाशिक विभाग :- प्र.क्र. २४, २५, २६ व २८ येथील उंटवाडी जगताप नगर, कालिका पार्क, इंद्रनगरी, कामटवाडे परिसर, पवननगर, आयटीआय पूल, शिवशक्ती चौक, शाहू नगर, खुटवड नगर, बंदावणे नगर, साळूंखे नगर, महालक्ष्मी नगर, डीजीपी क्र. २, मुरारी नगर, वावरे नगर, अंबड माऊली लॉन्स परिसर इ. 

नाशिक पूर्व विभाग :- वडाळा गांव, गावठाण परिसर, वडाळा रोड, जे. एम. सिटी कॉलेज, जयदीप नगर, साईनाथ नगर, विनयनगर परिसर, द्वारका व काठे गल्ली, जयशंकर नगर, टाकळी रोड परिसर, उपनगर पगारे मळा, प्र.क्र. २३ मधील अशोका मार्ग, हिरे नगर, टागोर नगर, डीजीपी नगर व गांधनीगर जलकुंभ १, २, ३ व ४ प्र.क्र. १६ मधील आंबेडकर नगर, सिध्दार्थ नगर, शिवाजीनगर परिसर, उत्तरा न गर, बोधलेनगर, गायत्रीनगर, अयोध्यानगर, प्र.क्र. २३ मधील डीजीपी नगर (भागश: कल्पतरुनगर, हॅपी होम कॉलनी, व बजरंगवाडी इ. भागातील मंगळवार दि. 09/03/2021 रोजी सायंकाळचा पाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.  याची  नागरिकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे अशी  विनंती महानगर पालिका पाणीपुरवठा विभागा तर्फे करण्यात आली आहे.