सर्वात वर

नाशिक शहरातील काही भागात १९ मार्चला पाणी पुरवठा होणार नाही

शहरातील कोणकोणत्या विभागात पाणी पुरवठा होणार नाही जाणून घ्या  

नाशिक – (Nashik city Water Supply) नाशिक शहरातील गांधी नगर जलशुध्दीकरण केंद्रास पाणी पुरवठा करणारी मुख्य पीएससी (सिंमेट) १२०० मी.मी.व्यासाची  रॉ-वॉटर पाईप लाईन, गोविंद नगर जॉगिंग ट्रॅक, मनोहर नगर समोरील गांधीनगरकडे जाणारी पाईपलाईन  नादुरुस्त झाल्याने हे काम काम तातडीने करायचे असल्याने . तसेच कालिका जलकुंभ येथील गुरुत्ववाहीनीची होणारी पाण्याची  गळती थांबविणेकरीता आवश्यक ते काम करावे लागणार असल्याने तसेच तदअनुशंगिक कामे करावी लागणार असल्याने  नाशिक शहरातील काही भागात(Nashik Water Supply) शुक्रवार दि.१९ मार्च २०२१ रोजी  सकाळचा, दुपारचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा  होऊ शकणार नाही. तसेच दि.२० मार्च  २०२१ रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, याची नागरीकांनी नोंद घ्यावी  ही विनंती. अशी माहिती नाशिक  महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने एका निवेदना द्वारे कळविले आहे. 

कोण  कोणत्या विभागाला होणार नाही पाणी पुरवठा (Nashik city Water Supply)

नाशिक पुर्व मधील प्रभाग क्र. 14 भागश:, 15 भागश:,23 भागश:, 30 भागश:  प्र.क्र. 16 पुर्ण

नाशिक पश्चिम मधील प्रभाग क्र. 7, 12 व 13 मधील संपुर्ण भाग

पंचवटी विभागातील प्रभाग क्र. 1,2,3,4,5 व 6 मधील संपुर्ण भाग

नाशिक रोड विभागातील प्रभाग क्र. 17, 18, 19, 20, 21 व 22

नविन नाशिक विभाग प्रभाग क्र. 25 भागश:, 26 भागश: व 28 भागश:

सातपुर विभाग प्रभाग क्र.   08, 9, 10,11,26 पुर्ण  27 चुंचाळे व दत्त नगर परिसर