सर्वात वर

Nashik Corona : शहरात २०३ तर ग्रामीण भागात १२२ कोरोनाचे नवे रुग्ण

बातमीच्या वर

२४ तासात ३२२ कोरोना मुक्त तर ९५४ संशयित दाखल  : ४ जणांचा मृत्यू : जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण  ९५.३० %

नाशिक (प्रतिनिधी)आज नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये  काही प्रमाणात वाढ दिसत आहे. दिवसभरात शहरात कोरोनाचे २०३ नवे रुग्ण आढळले आहेत तर ग्रामीण भागात १२२ नवे रुग्ण आढळले.आज कोरोना मुळे जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३० इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९६.०३ टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासात ३२२ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. संध्याकाळी ६:०० वाजे पर्यंत जिल्ह्यात एकूण ९५४ कोरोनाचे  संशयित रुग्ण आढळले. सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २८११ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १६४९ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात २०३,मालेगाव मध्ये ८,नाशिक ग्रामीण १०७ ,जिल्ह्या बाह्य ०७ रुग्ण आढळले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९४.०१,टक्के, नाशिक शहरात ९६.०३ टक्के, मालेगाव मध्ये  ९३.१९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.७८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.३०  इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात आज २०३ जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ५७० क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६३,६६६ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६१,१३८ जण कोरोना मुक्त झाले असून १६४९ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 

१) त्रिमुला आशियाना अपार्टमेंट,राज टॉवर,फ्लॅट क्र ५१०,चेतनानगर ,नाशिक येथील  ४१ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे 

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०४

नाशिक महानगरपालिका-०१

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०३

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १७१५

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ८७८

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ६:०० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०५

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -८९९

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०३

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –११

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३६

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ६२१

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)

https://janasthan.com/wp-content/uploads/2020/11/AGE-SEX-TEMPLATE-11-NOV-20.pdf
बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली