सर्वात वर

नाशिक मध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे आवाहन

व्हिडीओ पाहा 

नाशिक – नाशिक मध्ये कोरोनाचे (Nashik Corona) प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते आहे.नागरिकांनी जर नियमांचे पालन न केल्यास येणारी परिस्थिती खूप कठीण होऊ शकते मागच्यावेळी जसा समंजस पणा दाखवला तो समंजस पणा पुन्हा दाखवाल नाशिककरांनी त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे. 

रुग्ण संख्या वाढत चालली आहे आणि त्याचबरोबर लोकांकडून कोरोना संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. व्यक्तिगत कारवाया करून या गोष्टींना आळा घालणे अत्यंत अवघड असल्याने अशीच परिस्थिती सुरू राहिली तर निश्चितच काही निर्बंधांचा विचार करावा लागेल. तो निर्बंध लावण्याची वेळ येऊ न देण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

आजपर्यंत करोडो रुपये दंड केले आहेत परंतु त्याने काहीही फरक पडलेला नाही.. आपण कोरोना चे संकट वाढवून लॉक डाऊन चे संकट ओढवून घेत आहोतत्यामुळे टप्प्याटप्प्याने निर्बंध कठोर करणे हा एक पर्याय आहे किंवा थेट लॉक डाऊन करणे हे दोन पर्याय आहेत..परिस्थिती सुधारते की बिघडते यावर ते अवलंबून आहे.


व्हिडिओ पहा