सर्वात वर

Nashik Corona : आज जिल्ह्यात १३१५ संशयित तर ३५० नवे रुग्ण

बातमीच्या वर

२४ तासात नाशिक शहरात आज २१६ तर ग्रामीण भागात १३४ कोरोनाचे नवे रुग्ण : २८७ जण कोरोना मुक्त

नाशिक-आज नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३५० कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत.त्यापैकी शहरात २१६ तर ग्रामीण भागात १३४ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासात  जिल्ह्यात कोरोनाचे १३१५ रुग्ण संशयित आढळले आहे. तर २८७ जण कोरोना मुक्त झाले आहे.जिल्ह्या रुग्णालायाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण १३७७ अहवाल येणे येणे प्रगतीपथावर आहे तर कोरोना मुळे जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४६ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९६.३९ टक्के इतका झाला आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २७६४पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १४८५ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात २१६ मालेगाव मध्ये १४,नाशिक ग्रामीण १११,जिल्ह्या बाह्य ०९ रुग्ण आढळले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९३.९० टक्के, नाशिक शहरात ९६.३७ टक्के,मालेगाव मध्ये ९३.७१ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.७९ टक्के आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.५१ इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात दोन दिवसात २१६ जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ५७७ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६६,१३० रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६३,७४३ जण कोरोना मुक्त झाले असून १४८५ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०४

नाशिक महानगरपालिका-००

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०३

जिल्हा बाह्य-०१

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १७८२

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ९०२

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ६:३० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०६

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -१२५३

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०७

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०६

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –४३

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  -१३७७

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)

https://janasthan.com/wp-content/uploads/2020/11/AGE-SEX-TEMPLATE-27-NOV-20.pdf

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली