सर्वात वर

NASHIK CORONA:आज शहरात १४७ तर ग्रामीण मध्ये १०२ कोरोनाचे नवे रुग्ण

बातमीच्या वर

२४ तासात ४७३ कोरोना मुक्त तर ६१७ संशयित दाखल  : ७ जणांचा मृत्यू : जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण  ९५.३३ % 

नाशिक (प्रतिनिधी) आज दिवसभरात शहरात कोरोनाचे १४७ नवे रुग्ण आढळले आहेत तर ग्रामीण भागात कोरोनाचे १०२ नवे रुग्ण आढळले.आज कोरोना मुळे जिल्ह्यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.८८ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९५ .१७  टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासात ४७३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. संध्याकाळी ६:०० वाजे पर्यंत जिल्ह्यात एकूण ६१७ कोरोनाचे  संशयित रुग्ण आढळले. सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २९३५ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २०४२ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १४७,मालेगाव मध्ये ८,नाशिक ग्रामीण ९१ ,जिल्ह्या बाह्य ०३ रुग्ण आढळले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९४.९४,टक्के, नाशिक शहरात ९५.३७ टक्के, मालेगाव मध्ये  ९३.०६  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.७९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.३३  इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात आज १४७ जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ६२९  क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६२,९१४ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ५९,९९८ जण कोरोना मुक्त झाले असून २०४८ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 

१) शाहूनगर सिडको नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

२) प्लॉट क्रमांक ३०२,डिफोडील ड्रीम फ्लॉवर सोसायटी,फेम सिनेमा समोर,बोधले नगर, द्वारका येथील ६६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

३) चंद्रकांत गॅस एजन्सी मागे, मखमलाबाद नाशिक. येथिल ७४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०७

नाशिक महानगरपालिका-०३

मालेगाव महानगरपालिका-०१

नाशिक ग्रामीण-०३

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १६९६

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ८७४

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ६:०० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०६

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -५७५

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०१

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०६

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २९

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ५९१

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)

https://janasthan.com/wp-content/uploads/2020/11/AGE-SEX-TEMPLATE-6-NOV-20.pdf
बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली