सर्वात वर

Nashik Corona : आज जिल्ह्यात १५७३ संशयित तर ३२५ कोरोनाचे नवे रुग्ण

२४ तासात नाशिक शहरात आज २०९ तर ग्रामीण भागात ११६ कोरोनाचे नवे रुग्ण :२२३जण कोरोना मुक्त

नाशिक-नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढतांना दिसतोय आहे आजही नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्ह्यात ३२५ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत.त्यापैकी शहरात २०९ तर ग्रामीण भागात ११६ रुग्णांचा समावेश आहे. तर कोरोना संशयित म्हणून जिल्ह्यात  १५७३ रुग्ण आढळले आहे तर जिल्ह्या रुग्णालायाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण १८१२ अहवाल येणे येणे प्रगतीपथावर आहे..गेल्या २४ तासात कोरोनामुळे जिल्ह्यात  १ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४७ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९६.१८ टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासात २२३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २७१२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १६०० जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात २०९ मालेगाव मध्ये ०७,नाशिक ग्रामीण ९८ ,जिल्ह्या बाह्य ११ रुग्ण आढळले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९४.२१,टक्के, नाशिक शहरात ९६.१८ टक्के,मालेगाव मध्ये ९३.८० टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.८६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.४७ इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात दोन दिवसात २०९ जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ४५० क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६५,३६५ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६२,८६८ जण कोरोना मुक्त झाले असून १६०० जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०१

नाशिक महानगरपालिका-००

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०१

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १७६६

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ८९७

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ७:०० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०३

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -१५१४

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०२

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०२

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –५२

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –१८१२

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)