सर्वात वर

NASHIK CORONA:आज जिल्ह्यात १६५ तर शहरात १३९ कोरोनाचे नवे रुग्ण

बातमीच्या वर

२४ तासात ३०५ कोरोना मुक्त तर ५१४ संशयित दाखल  : ७ जणांचा मृत्यू 

नाशिक (प्रतिनिधी) नाशिक जिल्ह्यात आणि शहरात बऱ्या पैकी कोरोनाच्या रुग्णांची  घट सातत्याने बघायला मिळते आहे. आज नाशिक ग्रामीण भागात दिवसभरात कोरोनाचे २६ नवे रुग्ण आढळले आहेत तर  शहरात कोरोनाचे १३९ नवे रुग्ण आढळले.आज कोरोना मुळे जिल्ह्यात  ७ जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४४ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९४.९३  टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासात ३०५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. संध्याकाळी ६:०० वाजे पर्यंत जिल्ह्यात एकूण ५१४ कोरोनाचे  संशयित रुग्ण आढळले. सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण ३४१७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २२८९ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १३९,मालेगाव मध्ये २२,नाशिक ग्रामीण ०४ ,जिल्ह्या बाह्य ०० रुग्ण आढळले आहेत.


जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९३.५६,  टक्के, नाशिक शहरात ९४.९३  टक्के, मालेगाव मध्ये  ९३.०२  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.७७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.४४  इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात आज १३९ जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ६५४ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६२,४२२ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ५९,२६४ जण कोरोना मुक्त झाले असून २२८९ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 

१)अद्वैत प्लाझा, भाभा नगर, नवशक्ती चौक, द्वारका कॉर्नर ,नाशिक येथील ५५ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.

२) अंबड गाव,नाशिक येथील ६९ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०७
नाशिक महानगरपालिका-०२

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०५

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १६७९

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ८६९


आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ६:०० वाजे पर्यंत)


१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०६

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४७१

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०२

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०५

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३०

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ८०४


नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)

https://janasthan.com/wp-content/uploads/2020/11/AGE-SEX-TEMPLATE-3-NOV-20.pdf
बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली