सर्वात वर

Nashik Corona : आज जिल्ह्यात कोरोनाचे २१७ तर शहरात ९२ नवे रुग्ण

Nashik Corona : मागील २४ तासात २७३ जण कोरोना मुक्त : ५७२ कोरोनाचे संशयित ; ४ जणांचा मृत्यू 

नाशिक-अनेक दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्ये मध्ये घट होत असून उद्यापासून ज्याची सर्वजण आतुरतेने वाट बघत होतात अशा लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. आज जिल्ह्यात कोरोनाचे (Nashik Corona) एकूण २१७ चे नवीन रुग्ण दाखल झाले आहेत.त्यापैकी नाशिक शहरात ९२ तर ग्रामीण भागात १२१ नवे रुग्ण आढळले आहे.

गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ५७२ संशयित रुग्ण आढळले आहे. तर २७३ जण कोरोना मुक्त झाले.जिल्ह्या रुग्णालायाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना मुळे जिल्ह्यात ४ जणांना आपला जीव गमावला.नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०१ इतके झाले तर शहरात हा रेट ९७.५७ टक्के आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण १३६० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ८०९ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात ९२ मालेगाव मध्ये २६,नाशिक ग्रामीण ९२ ,जिल्ह्या बाह्य ०६ रुग्ण आढळले.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ६८३ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०४

नाशिक महानगरपालिका-०३

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०१

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २०२५

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १००२

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ६:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०१

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ५४६

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०३

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०४

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१८

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ६८३

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/01/AGE-SEX-TEMPLATE-15-1-2021.pdf

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)