सर्वात वर

Nashik Corona : आज जिल्ह्यात २२१ शहरात १२२ नवे रुग्ण

मागील २४ तासात १७९ जण कोरोना मुक्त : ५२१ संशयित तर आज ६ जणांचा मृत्यू 

नाशिक- आज नाशिक जिल्ह्यात २२१ कोरोनाचे एकूण नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी नाशिक शहरात १२२ तर ग्रामीण भागात ९९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ५२१ संशयित रुग्ण आढळले आहे. तर १७९ जण कोरोना मुक्त झाले.जिल्ह्या रुग्णालायाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना मुळे आज नाशिक जिल्ह्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९० इतके झाले तर शहरात हा रेट ९५.४७ टक्के आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण ३५१२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २२०४ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १२२ मालेगाव मध्ये ०७,नाशिक ग्रामीण ९०,जिल्ह्या बाह्य ०२ रुग्ण आढळले.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ७३२ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –नाशिक ग्रामीण मधे ९३.९९ %,नाशिक शहरात ९५.४७ %,मालेगाव मध्ये ९२.७२ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.६० %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.९० %इतके आहे.

आज शहराची स्थिती – शहरात १२२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ६७५ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत ६९,२१३ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ६६,०७६ जण कोरोना मुक्त झाले तर २२०४ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली.

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 

१) आडगांव, नाशिक येथील ८० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

२) फ्लॅट क्र ५,श्रीपाल  अपार्टमेंट,गणेश नगर पाईपलाईन रोड येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०६

नाशिक महानगरपालिका-०२

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०४

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १८६४

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ९३३

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ६:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०१

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४७३

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०४

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०३

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –४०

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ७३२