सर्वात वर

NASHIK CORONA : आज जिल्ह्यात २२८ तर शहरात १२९ कोरोनाचे नवे रुग्ण

बातमीच्या वर

२४ तासात ३६२ कोरोना मुक्त तर ५५१ संशयित आढळले : ३ जणांचा मृत्यू 

नाशिक (प्रतिनिधी) नाशिक जिल्ह्यतील कोरोनाची संख्या आता बऱ्यापैकी कमी होतांना दिसते आहे. आज नाशिक ग्रामीण भागात दिवसभरात कोरोनाचे ९९ नवे रुग्ण आढळले आहेत तर  शहरात कोरोनाचे १२९ नवे रुग्ण आढळले.मात्र तर आज ३ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासात ३६२रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. संध्याकाळी ६:०० वाजे पर्यंत जिल्ह्यात एकूण ५५१ कोरोनाचे  संशयित रुग्ण आढळले. सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण ३९९५ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २६१२ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १२९,मालेगाव मध्ये १०,नाशिक ग्रामीण ८७ ,जिल्ह्या बाह्य ०२ रुग्ण आढळले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी – जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९२.३४,  टक्के, नाशिक शहरात ९४.४८  टक्के, मालेगाव मध्ये  ९३.२३  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.६० टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.७९  इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात आज १२९ जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ७६५ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६१,९७६ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ५८,४९७ जण कोरोना मुक्त झाले असून २६१२  जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 

१) कोणार्क नगर,नाशिक येथील ४७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

२) जुने नाशिक येथील ९१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. 

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ३

नाशिक महानगरपालिका-०२

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०१

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १६७०

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ८६७


आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ७:०० वाजे पर्यंत)
१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०६

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४९२

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०४

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०७

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४२

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ५९८


नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)

https://janasthan.com/wp-content/uploads/2020/10/AGE-SEX-TEMPLATE-31-OCT-20.pdf

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली