सर्वात वर

NASHIK CORONA:आज जिल्ह्यात २४० तर शहरात १७२ कोरोनाचे नवे रुग्ण

बातमीच्या वर

२४ तासात ३७४ कोरोना मुक्त तर ७५५ संशयित दाखल  : ६ जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी)नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे २४० नवे रुग्ण आढळले आहेत तर  शहरात कोरोनाचे १७२ नवे रुग्ण आढळले.आज कोरोना मुळे जिल्ह्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.८८ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९५ .१७  टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासात ३७४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. संध्याकाळी ६:०० वाजे पर्यंत जिल्ह्यात एकूण ७५५ कोरोनाचे  संशयित रुग्ण आढळले. सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण ३१६६ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २१५८ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १७२,मालेगाव मध्ये ६,नाशिक ग्रामीण ६० ,जिल्ह्या बाह्य ०२ रुग्ण आढळले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९४.५१,  टक्के, नाशिक शहरात ९५.१७  टक्के, मालेगाव मध्ये  ९३.१०  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.७७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.८८  इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात आज १७२ जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ६१८ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६२,७६७ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ५९,७३८ जण कोरोना मुक्त झाले असून २१५८ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 
१) संत साधना-२९,शास्त्री नगर, गजानन महाराज मंदिर, इंदिरानगर,नाशिक येथील ७२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०६

नाशिक महानगरपालिका-०१

मालेगाव महानगरपालिका-०१

नाशिक ग्रामीण-०४

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १६८९

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ८७१

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ६:०० वाजे पर्यंत)
१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०५
२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ७०९

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ००

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०२

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३९

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ७२८

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)

https://janasthan.com/wp-content/uploads/2020/11/AGE-SEX-TEMPLATE-5-NOV-20.pdf
बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली