सर्वात वर

NASHIK CORONA:आज जिल्ह्यात २४४ तर शहरात १५४ कोरोनाचे नवे रुग्ण

बातमीच्या वर

२४ तासात ४१८ कोरोना मुक्त तर ८९० संशयित : आज एकही मृत्यू नाही 

नाशिक (प्रतिनिधी) नाशिक जिल्ह्यतील दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची  संख्या आता बऱ्यापैकी कमी होतांना दिसत असली तरी कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. गळ्या आठ ते दहा महिन्यापासून प्रशासन मोठ्या प्रमाणात काळजी घेत आहे.आज नाशिक ग्रामीण भागात दिवसभरात कोरोनाचे ९० नवे रुग्ण आढळले आहेत तर  शहरात कोरोनाचे १५४ नवे रुग्ण आढळले.आज कोरोना मुले एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही हि समाधानाची बाब आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.९५ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९४.३९  टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासात ४१८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. संध्याकाळी ६:०० वाजे पर्यंत जिल्ह्यात एकूण ८९० कोरोनाचे  संशयित रुग्ण आढळले. सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण ३८२१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २५१७ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १५४,मालेगाव मध्ये ४,नाशिक ग्रामीण ८४ ,जिल्ह्या बाह्य ०२ रुग्ण आढळले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९३.१३, टक्के, नाशिक शहरात ९४.३९  टक्के, मालेगाव मध्ये  ९३.०६  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.४६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.९५ इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात आज १५४ जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ७६५ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६२,१३० रुग्ण झाले आहेत त्यापैकी ५८,७४६ जण कोरोना मुक्त झाले असून २५१७ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०

नाशिक महानगरपालिका-००

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-००

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १६७०

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ८६७


आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी :०० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०५

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ८५४

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०९

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०६

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ११

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ३५९


नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या

 (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)

https://janasthan.com/wp-content/uploads/2020/11/AGE-SEX-TEMPLATE-1-NOV-20.pdf
बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली