सर्वात वर

Nashik Corona : आज जिल्ह्यात २८२ तर शहरात १८४ कोरोनाचे नवे रुग्ण

२४ तासात २३२ जण कोरोना मुक्त ,७ जणांचा  मृत्यू : दिवसभरात ८१७ संशयीत 

नाशिक-आज शहरात १८४ कोरोनाचे नवीन रुग्ण दाखल झाले आहेत.तर नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ९८ कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. असे जिल्ह्यात कोरोनाच्या एकूण २८२ रुग्णात वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ८१७ संशयित रुग्ण आढळले आहे. तर २३२ जण कोरोना मुक्त झाले आहे.जिल्ह्या रुग्णालायाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ८७७ अहवाल येणे येणे प्रगतीपथावर आहे तर कोरोना मुळे जिल्ह्यात ७ जणांना आपला जीव गमावला. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४३ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९६.४० टक्के इतका झाला आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २८३३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १५०२ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १८४ मालेगाव मध्ये ०९,नाशिक ग्रामीण ७९ ,जिल्ह्या बाह्य १० रुग्ण आढळले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९३.६७ टक्के, नाशिक शहरात ९६.४०टक्के,मालेगाव मध्ये ९३.२६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.४४ टक्के आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.४३ इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात दोन दिवसात १८५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ७१८ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६६,८९९ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६४,४९० जण कोरोना मुक्त झाले असून १५०३ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 

१) टाकळी,नाशिक येथील ६३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

२)आडगाव, नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०७

नाशिक महानगरपालिका-०२

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०५

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १७९८

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ९०६

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ७:०० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०५

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -७६३

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०९

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०७

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –३३

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ८७७

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)