सर्वात वर

Nashik : कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ आज जिल्ह्यात ४०७ शहरात २१८ नवे रुग्ण

  

मागील २४ तासात ४४० जण कोरोना मुक्त : ८०६ संशयित तर आज ११ जणांचा मृत्यू 

नाशिक- आज नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये काल पेक्षा वाढ झाली आहे. आज जिल्ह्यात ४०७ कोरोनाचे एकूण नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी नाशिक शहरात २१८ तर ग्रामीण भागात १८९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ८०६ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ४४० जण कोरोना मुक्त झाले.जिल्ह्या रुग्णालायाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना मुळे आज नाशिक जिल्ह्यात आज ११ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०६ इतके झाले तर शहरात हा रेट ९५.४८ टक्के आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण ३३५६ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २२०६ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात २१८ मालेगाव मध्ये ०८,नाशिक ग्रामीण १७७ ,जिल्ह्या बाह्य ०४ रुग्ण आढळले.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ८३४ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –नाशिक ग्रामीण मधे ९४.४२ %,नाशिक शहरात ९५.४८ %,मालेगाव मध्ये ९३.१३ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.२७ % आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.०६ %इतके आहे.

आज शहराची स्थिती – शहरात २१८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ६५० क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत ६९,७३७ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ६६,५८६ जण कोरोना मुक्त झाले तर २२०६ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली.

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 

१) २०४,आकार पॅरेडाइज् देवकर कॉलेज समोर,म्हसरूळ, नाशिक येथील ७१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

२) दिपाली नगर, सिडको, नाशिक येथील ७३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

३) नाशिक येथील ४८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. 

४) प्रफुल्ल बंगलो, गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक येथील ८५ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

५) १४,एसटी कॉलनी रोड,अमृतधाम, पंचवटी, नाशिक येथील ५५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

६) फ्लॅट क्र-१, स्वामी प्रतीक अपार्टमेंट, स्वामी विवेकानंद नगर, तुळजाभवानी मंदिराजवळ, अशोक नगर, सातपूर येथील ४४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

७) दिंडोरी रोड,पंचवटी नाशिक येथील ४६ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ११

नाशिक महानगरपालिका-०७

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०४

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १८८६

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ९४५

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ६:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०२

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ७५२

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०६

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०५

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –४१

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ८३४

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)