सर्वात वर

Nashik Corona : आज जिल्ह्यात ४५२ तर शहरात २६६ नवे रुग्ण

मागील २४ तासात २९९ जण कोरोना मुक्त : ११७७ कोरोनाचे संशयित ; ५ जणांचा मृत्यू 

नाशिक-नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झालेली दिसून येत आहेत.आज जिल्ह्यात एकूण ४५२ Corona चे नवीन रुग्ण दाखल झाले आहेत.त्यापैकी नाशिक शहरात २६६ तर ग्रामीण भागात १८६ कोरोनाचे  नवे रुग्ण आढळले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ११७७ संशयित रुग्ण आढळले आहे. तर २९९ जण कोरोना मुक्त झाले.

जिल्ह्या रुग्णालायाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना मुळे जिल्ह्यात ५ जणांना आपला जीव गमावला.नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९४ इतके झाले तर शहरात हा रेट ९५.६७ टक्के आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण ३४३२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २०४४ जण उपचार घेत आहेत.

सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात २६६ मालेगाव मध्ये १३,नाशिक ग्रामीण १६२ ,जिल्ह्या बाह्य ११ रुग्ण आढळले.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण १२२० अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –नाशिक ग्रामीण मधे ९३.७३ %,नाशिक शहरात ९५.६७ %,मालेगाव मध्ये ९२.७७ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९०.९८%आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.९४ %इतके आहे.

आज शहराची स्थिती – शहरात २६६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ७१७ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत ६८,५७४ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ६५,६०८ जण कोरोना मुक्त झाले तर २०४४ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिकेतर्फे देण्यात आली. 

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०५

नाशिक महानगरपालिका-०१

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०३

जिल्हा बाह्य-०१

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १८४०

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ९२२

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ८:००वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०३

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ११२०

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०६

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०३

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –४५

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – १२२०

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)