सर्वात वर

Nashik Corona :आज जिल्ह्यात ३७१ तर शहरात कोरोनाचे २१४ नवे रुग्ण

२४ तासात ३११ जण कोरोना मुक्त ग्रामीण भागात १५७ रुग्ण,६ जणांचा मृत्यू : दिवसभरात १२०० संशयीत 

नाशिक-आज नाशिक जिल्ह्यात ३७१ कोरोनाचे नवीन रुग्ण दाखल झाले आहेत.तर नाशिक शहरात २१४ आणि  ग्रामीण भागात १५७ कोरोनाचे  नवे रुग्ण आढळले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे १२०० संशयित रुग्ण आढळले आहे. तर ३११ जण कोरोना मुक्त झाले आहे.जिल्ह्या रुग्णालायाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना मुळे जिल्ह्यात ६ जणांना आपला जीव गमावला.नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०३ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९६.९८ टक्केआहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण ३२९३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १८०५ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात २१४ मालेगाव मध्ये १०,नाशिक ग्रामीण १४३ ,जिल्ह्या बाह्य ०४ रुग्ण आढळले आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ११६८ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी -जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९३.२१ टक्के, नाशिक शहरात ९५.९८ टक्के,मालेगाव मध्ये ९३.०१ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.२३ टक्के आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.०३ इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात दोन दिवसात २१४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ७१६ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६७,७८१ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६५,०५६ जण कोरोना मुक्त झाले असून १८०५ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 

१) आडगाव नाशिक येथील ५५ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.

२) शासकीय दूध डेअरी समोर पटेल कॉलनी, त्रंबक रोड येथील ९१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

३)घर नंबर २, प्रांजल सोसायटी, कोणार्क नगर, आडगाव शिवार येथील ६४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

४) राजीव नगर, नाशिक येथील ७० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०६

नाशिक महानगरपालिका-०४

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०२

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १८२६

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ९२०

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ६:३० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०५

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -११२१

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०७

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०४

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –४८

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ११६८

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)