सर्वात वर

Nashik Corona : आज जिल्ह्यात कोरोनाचे १८५ तर शहरात ११४ नवे रुग्ण

Nashik Corona Update : गेल्या २४ तासात १६४ जण कोरोना मुक्त : १०८६ कोरोनाचे संशयित ; ३ जणांचा मृत्यू 

नाशिक – (Nashik Corona)आज पासून संपूर्ण भारतात जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. कोरोनाची लस जरी आली असली तरी  वावरतांना तीन सूत्र पाळावेच लागणार आहे. हे तीन सूत्र म्हणजे मास्क वापरणे ,सुरक्षित अंतर ठेवणे आणि नियमित हात धुवणे हे नियम नागरिकांना पाळावेच लागणार आहे. नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कोरोनाचे रुग्ण कमी जरी झाले असले तरी कोरोनाच धोका अद्याप टळलेला नाही. 

आज जिल्ह्यात कोरोनाचे (Nashik Corona) एकूण १८५ चे नवीन रुग्ण दाखल झाले आहेत.त्यापैकी नाशिक शहरात ११४ तर ग्रामीण भागात ७१ नवे रुग्ण आढळले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ५४९ संशयित रुग्ण आढळले आहे. तर १६४ जण कोरोना मुक्त झाले.

जिल्ह्या रुग्णालायाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना मुळे जिल्ह्यात ३ जणांना आपला जीव गमावला.नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०० इतके झाले तर शहरात हा रेट ९७.५३ टक्के आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण १३७८ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ८३८ जण उपचार घेत आहेत.

सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात ११४ मालेगाव मध्ये ०३,नाशिक ग्रामीण ६७ ,जिल्ह्या बाह्य ०१ रुग्ण आढळले.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण १०८६ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –नाशिक ग्रामीण मधे ९६.४० %,नाशिक शहरात ९७.५३ %,मालेगाव मध्ये ९३.२३ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९५.२५%आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.०० %इतके आहे.

आज शहराची स्थिती (Nashik Corona) शहरात ११४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ४२० क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत ७४,५५० रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ७२,७१०जण कोरोना मुक्त झाले तर ८३८ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिकेतर्फे देण्यात आली. 

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०३

नाशिक महानगरपालिका-००

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०३

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २०२८

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १००२

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ६:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०२

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ५२०

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०६

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०६

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१५

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – १०८६

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/01/AGE-SEX-TAMPLATE-16-01-2021.pdf