सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १३३० नवे रुग्ण तर शहरात ७६८ रुग्ण

मागील २४ तासात जिल्ह्यात एकूण १३०२ कोरोनाचे संशयित ; २९६३अहवाल येणे प्रतिक्षेत  तर ६ जणांचा मृत्यू ,५४९ कोरोना मुक्त 

नाशिक – (Nashik Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून जिल्यात आज एकूण १३३०नवे रुग्ण आढळले असून त्यापैकी शहरात ७६८ रुग्ण  आढळल्याने नाशिककरांच्या चिंतेत भर पडली आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ७६८ तर ग्रामीण भागात ३८७ मालेगाव मनपा विभागात १३८ तर बाह्य ३७असे नवे रुग्ण आढळले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ११२४ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ५४९ जण कोरोना मुक्त झाले तर ६ जणांना आपला जीव गमवावा लागला 

नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३० इतके झाले तर शहरात हा रेट ९४.२३ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ५०१७१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ३८०२ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण २९६३ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 

(Nashik Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –नाशिक ग्रामीण मधे ९५.४० %,नाशिक शहरात ९४.२३ %,मालेगाव मध्ये ८८.४३ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.४९ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.३० %इतके आहे.

आज शहराची स्थिती – शहरात ७६८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ५६६ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत  ८४,१८२ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ७९,३२३ जण कोरोना मुक्त झाले तर ३८०२ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०६

नाशिक महानगरपालिका-०१

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०३

जिल्हा बाह्य-०२

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २१५५

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १०५७

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित( सायंकाळी ९ :००वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०८

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १२४९

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०६

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१८

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२१

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – २९६३

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-10-MAR-2021.pdf