सर्वात वर

आज नाशिक शहरात ३४९ तर जिल्ह्यात एकूण ५५८ कोरोनाचे नवे रुग्ण

मागील २४ तासात ३३० जण कोरोना मुक्त तर १३६८ कोरोनाचे संशयित ; ५ जणांचा मृत्यू 

नाशिक – (Nashik Corona Update)संपूर्णे देशात कोरोनाच्या प्रतिबंधांसाठी लसीकरण मोहीम सुरु आहे. देशात लसीकरणाचा ३ रा टप्पा सुरु आहे.काही दिवसापूर्वी आटोक्यात येणाऱ्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे नाशिक शहरात सातत्याने कोरोना रुणांमध्ये वाढ होत आहे. आज पुन्हा नाशिक शहरात ३४९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून जिल्ह्यात आज एकूण ५५८ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. 

गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे १३६८ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ३३० जण कोरोना मुक्त झाले. जिल्ह्या सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना मुळे जिल्ह्यात 5 जणांना आपला जीव गमावला.नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५४ इतके झाले तर शहरात हा रेट ९५.६५ टक्के आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण ३४२१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २५०८ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात ३४९ मालेगाव मध्ये १९,नाशिक ग्रामीण १७६ ,जिल्ह्या बाह्य १४ रुग्ण आढळले.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण २२८१ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.

 (Nashik Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –नाशिक ग्रामीण मधे ९५.९२ %,नाशिक शहरात ९५.६५ %,मालेगाव मध्ये ९१.६६ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.६८ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.५४ %इतके आहे.

आज शहराची स्थिती – शहरात ३४९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ६५३ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत  ८१,६११ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ७८,०५९ जण कोरोना मुक्त झाले तर  २५०८ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०५

नाशिक महानगरपालिका-०१

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०४

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २१२२

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १०४४

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ६:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०६

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १३२१

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०७

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०५

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२९

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – १३६८

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-4-MAR-2021.pdf