सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे ३८० नवे रुग्ण तर ३६२ कोरोना मुक्त

मागील २४ तासात ७५३ कोरोनाचे संशयित दाखल ; ५ जणांचा मृत्यू २७६७ रिपोर्ट प्रतीक्षेत 

नाशिक – (Nashik Corona Update) आज नाशिक जिल्ह्यात एकूण ३८० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहे त्यापैकी शहरात २२२ रुग्ण झाले आहेत. गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ७५३ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ३६२ जण कोरोना मुक्त झाले.

जिल्ह्या सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना मुळे जिल्ह्यात ५ जणांना आपला जीव गमावला.नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५४ इतके झाले तर शहरात हा रेट ९५.६२ टक्के आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण ३४३४ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २५३७ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात २२२ मालेगाव मध्ये ४८,नाशिक ग्रामीण ९० ,जिल्ह्या बाह्य २० रुग्ण आढळले.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण २७६७ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.

 (Nashik Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –नाशिक ग्रामीण मधे ९६.१० %,नाशिक शहरात ९५.६२ %,मालेगाव मध्ये ९०.८२ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.७७ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.५४ %इतके आहे.

आज शहराची स्थिती – शहरात २२२  जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ६२६ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत  ८१,८३३ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ७८,२५० जण कोरोना मुक्त झाले तर  २५३७  जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०५
नाशिक महानगरपालिका-०२

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०३

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २१२७

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १०४६

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ८:००वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०४

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ७२०

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०६

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०७

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१६

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – २७६७

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-5-MAR-2021.pdf