सर्वात वर

नाशिक जिल्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ,४२४ नवे रुग्ण

मागील २४ तासात २४३ जण कोरोना मुक्त : ८९२ कोरोनाचे संशयित ; २ जणांचा मृत्यू 

नाशिक – (Nashik Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. आज जिल्ह्यात ४२४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून नाशिक शहरात २६० नवे रुग्ण आढळले आहेत.तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लस जरी दाखल झाली असली तरी नागरिकांना कोरोना पासून बचाव करण्यासाठी  तीन सूत्र पाळावेच लागणार आहे. हे तीन सूत्र म्हणजे मास्क वापरणे , सुरक्षित अंतर ठेवणे आणि नियमित हात धुवणे हे नियम नागरिकांना पाळावेच लागणार आहे.

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात २६० तर ग्रामीण भागात १३१, मालेगाव मनपा विभागात २५ तर बाह्य ८ नवे रुग्ण आढळले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ८९२ संशयित रुग्ण आढळले आहे. तर २४३ जण कोरोना मुक्त झाले.जिल्ह्या सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४८ इतके झाले तर शहरात हा रेट ९६.८१ टक्के आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २१६२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १५०० जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ११२४ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Nashik Corona Update)नाशिक ग्रामीण मधे ९६.२५ %,नाशिक शहरात ९६.८१ %,मालेगाव मध्ये ९३.३४ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.७०%आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.४८ %इतके आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०२

नाशिक महानगरपालिका-०१

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०१

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २०९२

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १०३६

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/02/AGE-SEX-TEMPLATE-24-FEB-2021-2.pdf