सर्वात वर

Nashik Corona Update : जिल्ह्यात आज ५३७ नवे रुग्ण तर ३५८ कोरोना मुक्त

मागील २४ तासात ७७३ कोरोनाचे संशयित ; ३४९६ अहवाल येणे प्रतिक्षेत  तर ९ जणाचा मृत्यू , ३५८ कोरोना मुक्त 

नाशिक – (Nashik Corona Update)नाशिक जिल्यात आज एकूण ५३७ नवे रुग्ण आढळले असून त्यापैकी शहरातील रुग्णांमध्ये  ४११ ने वाढ झाली आहे. उद्यापासून जिल्हा प्रशासनाने सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्याच प्रमाणे सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळात सर्व धार्मिक स्थळे ही बंद राहणार आहे. तर येत्या शनिवार आणि रविवारी जिल्ह्यातील सर्व दुकाने (अत्यावश्यक सेवा सोडून) दिवसभर बंद राहणार आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ४११ तर ग्रामीण भागात ७१ मालेगाव मनपा विभागात ४१ तर बाह्य १४ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ७७३ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ३५८ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४. ८५ इतके झाले तर शहरात हा रेट ९४.७२ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ४३६९ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ३३५० जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ३४९६ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनीदिली. 

(Nashik Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी – नाशिक ग्रामीण मधे ९६.०६ %,नाशिक शहरात ९४.७२ %,मालेगाव मध्ये ८९.१२ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.१४ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.८५ %इतके आहे.

आज शहराची स्थिती – शहरात ४११ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ५४९ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत  ८३,४१४ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ७९,००८ जण कोरोना मुक्त झाले तर ३३५० जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०९

नाशिक महानगरपालिका-०४

मालेगाव महानगरपालिका-०२

नाशिक ग्रामीण-०३

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २१४९

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १०५६

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ८:००वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०८

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ७१४

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०३

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१३

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –३५

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ३४९६

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-9-MAR-2021.pdf