सर्वात वर

सावधान : नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ : ६०१ नवे रुग्ण

मागील २४ तासात २९१ जण कोरोना मुक्त : १४२१ कोरोनाचे संशयित ; ३ जणांचा मृत्यू 

नाशिक – (Nashik Corona Update) नाशिक जिल्ह्यात सातत्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. आज जिल्ह्यात ६०१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून नाशिक शहरात ३६६ नवे रुग्ण आढळले आहेत.तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ३६६ तर ग्रामीण भागात १६२, मालेगाव मनपा विभागात ५३ तर बाह्य २०असे  नवे रुग्ण आढळले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल १४२१ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत . तर २९१ जण कोरोना मुक्त झाले.जिल्ह्या सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२४ इतके झाले तर शहरात हा रेट ९६.५४ टक्के आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २४६९ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १६७२ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ८०७ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Nashik Corona Update)नाशिक ग्रामीण मधे ९६.१२ %,नाशिक शहरात ९६.५४ %,मालेगाव मध्ये ९२.९७ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.६०%आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.२४ %इतके आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०३

नाशिक महानगरपालिका-०१

मालेगाव महानगरपालिका-०१

नाशिक ग्रामीण-०१

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २०९५

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १०३७

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/02/AGE-SEX-TEMPLATE-25-FEB-2021.pdf