सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ आज ६७५ नवे रुग्ण तर शहरात ४५० रुग्ण

मागील २४ तासात ११२४ कोरोनाचे संशयित ; २९५८ अहवाल येणे प्रतिक्षेत  तर ६ जणाचा मृत्यू , ३८९ कोरोना मुक्त 

नाशिक – (Nashik Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जिल्यात आज एकूण ६७५नवे रुग्ण आढळले असून त्यापैकी शहरात ४५० रुग्ण  आढळल्याने नाशिककरांच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यात मालेगावच्या महापौर ताहेरा शेख यांनी शाळा,कॉलेज आणि खासगी कोचिंग क्लासेस ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.नागरिकांनी नियम पाळण्यात हलगर्जी केल्या मुळे गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णात नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढ बघायला मिळते आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ४५० तर ग्रामीण भागात १३७ मालेगाव मनपा विभागात ७२ तर बाह्य १६ असे नवे रुग्ण आढळले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ११२४ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ३८९ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९७ इतके झाले तर शहरात हा रेट ९४.९४ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ४२२६ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ३१५१ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण २९५८ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनीदिली. 

(Nashik Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –नाशिक ग्रामीण मधे ९५.८७ %,नाशिक शहरात ९४.९४ %,मालेगाव मध्ये ८९.८० % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.२१ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.९७ %इतके आहे.

आज शहराची स्थिती – शहरात ४५० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ५६८ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत  ८३,००३ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ७८,८०० जण कोरोना मुक्त झाले तर ३१५१ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०६

नाशिक महानगरपालिका-०४

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०२

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २१४०

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १०५२

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ८:००वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०४

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १०८०

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०५

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१५

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२०

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – २९५८

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-8-MAR-2021.pdf