सर्वात वर

नाशिक शहर,निफाड,बागलाण,सिन्नरसह काही तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ

सद्यस्थितीत जिल्ह्यात ३६ हजार ६४२ रुग्णांवर उपचार सुरू : जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ९४ हजार २६७ रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक – (Nashik Corona Update) नाशिक शहरासह निफाड,बागलाण,सिन्नर सह नाशिक तालुक्यात कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे हि चिंतेची बाब आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ९४ हजार २६७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ३६ हजार ६४२ रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ३७८ ने घट झाली आहे.आत्तापर्यंत २ हजार ७२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे,अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली आहे.

(Nashik Corona Update) – उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण 
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ९६०, 
चांदवड ९९७, 
सिन्नर १ हजार २७४, 
दिंडोरी ८९४, 
निफाड २ हजार ६३९, 
देवळा १ हजार १९३, 
नांदगांव ८२४, 
येवला ४०२, 
त्र्यंबकेश्वर ४७२, 
सुरगाणा २११, 
पेठ ९७, 
कळवण ६४९,  
बागलाण १ हजार ३४९, इगतपुरी ५७४, 
मालेगांव ग्रामीण ९३५ 

असे एकूण १३ हजार ४७० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २० हजार ९९३ ,मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७८५  तर जिल्ह्याबाहेरील ३९४ असे एकूण ३६ हजार ६४२  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  २ लाख ३३  हजार ६३९ रुग्ण आढळून आले आहेत.

(Nashik Corona Update) -रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८१.१०  टक्के, नाशिक शहरात ८४.४६ टक्के, मालेगाव मध्ये  ७९.५६  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५.२९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.१५  इतके आहे.

मृत्यु :
नाशिक ग्रामीण १ हजार १४५  नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार २६७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २२०  व जिल्हा बाहेरील ८८ अशा एकूण २ हजार ७२० रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 

(Nashik Corona Update) – लक्षणीय :
◼️२ लाख ३३  हजार ६२९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख ९४ हजार २६७  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  ३६  हजार ६४२  पॉझिटिव्ह रुग्ण.
◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.१५ टक्के.

(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)