सर्वात वर

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिक मधील काही सांस्कृतिक कार्यक्रम रद्द

नाशिक –  नाशिक मध्ये काही दिवसापासून सातत्याने कोरोनाच्या (Nashik Corona Update) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये होणारे काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळा जनहितार्थ आयोजकांनी रद्द करून ते कार्यक्रम पुढे ढकलले आहे. 

नाशिक शहरात परशुराम साईखेकर नाट्यगृहात २३ फेब्रुवारी पासून सूर होणारा वसंत पोतदार स्मृती नाट्य महोत्सव काही काळासाठी रहित केला असल्याचे आयोजक राजा पाटेकर,राजेश जाधव ,ईश्वर जगताप यांनी कळविले आहे. त्याच प्रमाणे श्री संत गाडगे महाराज पतसंस्थे द्वारा २४ फेब्रुवारीला होणारा राज्यस्तरीय कर्मयोगी  श्री संत गाडगे महाराज जीवन गौरव सोहळा व कर्मवीर निवृत्ती दादा बर्वे गोदागौरव सोहळा नाशिक मधील कोरोनाच्या (Nashik Corona Update)  वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आल्याचे आयोजक व संस्थेचे अध्यक्ष गणेश बर्वे यांनी जाहीर केले आहे.