सर्वात वर

Nashik : जिल्ह्यात आज ११४० नवे रुग्ण तर ६०० कोरोना मुक्त

नागरीकांनी नियम न पाळल्यास कठोर निर्बंध लागण्याचे संकेत 

मागील २४ तासात १५४० कोरोनाचे संशयित ; २८२४ अहवाल येणे प्रतिक्षेत  तर ३ जणाचा मृत्यू , ६०० कोरोना मुक्त 

नाशिक – (Nashik Corona Update) नाशिक जिल्ह्यात काल पेक्षा आजचा कोरोना बाधितांचा आकडा कमी असला तरी नाशिक जिल्ह्यासाठी ही वाढ चिंतेचा विषय आहे.आज जिल्ह्यात  एकूण ११४० नवे रुग्ण आढळले असून त्यापैकी शहरातील रुग्णांमध्ये  ७७३ ने वाढ झाली आहे. काल  जिल्हा प्रशासनाने सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला असला तरी आजही अनेक जण बेफिकीर पणे वागून मोठ्या संकटाला आमंत्रण देत आहे असे चित्र निदर्शनास आले आहे.

आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही ठिकाणी नाईलाजाने लॉक डाऊन करावे लागेल असे संकेत दिले आहेत. ती वेळ नाशिककरांवर येऊ नये अशी अनेकांची इच्छा आहे. नाशिकच्या जिल्हा प्रशासना लागू केलेले नियम नागरीकांनी काटेकोरपणे पाळले तर या जागतिक संकटाचा आपण नक्की सामना करू शकू असे जाणकारांचे मत आहे.पण नागरीकांनी जर नियम पाळले नाही तर एक दोन दिवसात प्रशासन कठोर निर्णय घेईल असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ७७३ तर ग्रामीण भागात २६० मालेगाव मनपा विभागात ९२ तर बाह्य १५ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे १५४० संशयित रुग्ण आढळले आहे. तर ६०० जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३. ९३ इतके झाले तर शहरात हा रेट ९३.७१ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ५७०८ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ४२८८ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण २८२४ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनीदिली. 

(Nashik Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी – नाशिक ग्रामीण मधे ९५.२१ %,नाशिक शहरात ९३.७१ %,मालेगाव मध्ये ८९.१८ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.३६ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.९३ %इतके आहे.

आज शहराची स्थिती – शहरात ७७३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ५६६ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत  ८४,९५५ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ७९,६०९ जण कोरोना मुक्त झाले तर ४२८८ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०३

नाशिक महानगरपालिका-०१

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०२

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २१५८

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १०५८

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ८:००वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०८

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १४७५

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०८

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१९

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –३०

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  २८२४

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-11-MAR-2021.pdf