सर्वात वर

Nashik Corona : आज जिल्ह्यात ४०३ तर शहरात १९३ कोरोनाचे नवे रुग्ण

२४ तासात २०८ जण कोरोना मुक्त ,६ जणांचा  मृत्यू : दिवसभरात १००१ संशयीत 

नाशिक-आज नाशिक जिल्ह्यात ४०३ कोरोनाचे नवीन रुग्ण दाखल झाले आहेत.तर नाशिक शहरात १९३ तर ग्रामीण भागात ११० कोरोनाचे रुग्ण आढळले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे १००१ संशयित रुग्ण आढळले आहे. तर २०८ जण कोरोना मुक्त झाले आहे.जिल्ह्या रुग्णालायाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ६०६ अहवाल येणे येणे प्रगतीपथावर आहे तर कोरोना मुळे जिल्ह्यात ६ जणांना आपला जीव गमावला. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२६ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९६.२६ टक्के इतका झाला आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण ३०२२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १५९६ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १९३ मालेगाव मध्ये १४,नाशिक ग्रामीण १९१ ,जिल्ह्या बाह्य ०५ रुग्ण आढळले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९३.३९ टक्के, नाशिक शहरात ९६.२६ टक्के,मालेगाव मध्ये ९३.०६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.१९ टक्के आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.२६ इतके आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०६

नाशिक महानगरपालिका-०४

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०२

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १८०४

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ९०६

आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित  (सायंकाळी ७:०० वाजे पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०५

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -९११

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०५

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१०

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –७०

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ६०६

नाशिक जिल्हा / शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)