सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ५६३ नवे रुग्ण तर ३२५ जण कोरोना मुक्त

मागील २४ तासात ९६८ कोरोनाचे संशयित ; २४९२ अहवाल येणे प्रतिक्षेत तर १ जणाचा मृत्यू 

नाशिक – (Nashik Corona Update) आज नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे ५६३ नवे रुग्ण आढळले असून त्यापैकी शहरात ३१४ रुग्ण आढळले आहे.नागरिकांनी नियम पाळण्यात हलगर्जी केल्या मुळे गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णात नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढ बघायला मिळते आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नाशिक येथे २६ ते २८ मार्च रोजी होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही पुढे ढकलण्यात आले आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ३१४ तर ग्रामीण भागात १८९, मालेगाव मनपा विभागात ४९ तर बाह्य ११ नवे रुग्ण आढळले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ९६८ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ३२५ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१७ इतके झाले तर शहरात हा रेट ९५.२६ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ३९४६ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २८६३ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण २४९२ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे..अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनीदिली. 

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Nashik Corona Update) – नाशिक ग्रामीण मधे ९५.८९ %,नाशिक शहरात ९५.२६ %,मालेगाव मध्ये ८९.३६ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.०६ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.१७ %इतके आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०१

नाशिक महानगरपालिका-००

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०१

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २१३४

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १०४८

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-7-MAR-2021.pdf