सर्वात वर

Nashik : आज शहरात ८४४ नवे रुग्ण तर जिल्ह्यात एकूण ११३५ रुग्ण

मागील २४ तासात १५५८ कोरोनाचे संशयित ; २८३३ अहवाल येणे प्रतिक्षेत  तर ८ जणाचा मृत्यू , ४५६ कोरोना मुक्त 
नाशिक – (Nashik Corona Update)नाशिक जिल्यात आज पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतांना दिसत आहे. आज नाशिक शहरात कोरोनाचे ८४४ नव्या रुग्णांमध्येवाढ झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील आजच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ११३५ झाली आहे.हि संख्या जर अशीच वाढत राहिली तर प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावा लागेल असे संकेत आज सकाळीच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत.

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ८४४ तर ग्रामीण भागात २१३ मालेगाव मनपा विभागात ५५ तर बाह्य २३ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे १५५८ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ४५६ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३. ४६ इतके झाले तर शहरात हा रेट ९३.०२ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ६३७९पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ४९२४ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण २८३३ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात को रोनामुळे ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनीदिली. 

(Nashik Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी – नाशिक ग्रामीण मधे ९५.३१ %,नाशिक शहरात ९३.०२ %,मालेगाव मध्ये ८८.३२ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.८१ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.४६ %इतके आहे.

आज शहराची स्थिती (Nashik Corona Update) – शहरात ८४४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ५३२ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत  ८५,७९९ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ७९,८१४ जण कोरोना मुक्त झाले तर ४९२४ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०८

नाशिक महानगरपालिका-०३

मालेगाव महानगरपालिका-०१

नाशिक ग्रामीण-०४

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २१६६

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १०६१

(Nashik Corona Update)

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ८:००वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ११

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १४७५

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०६

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१५

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –५१

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  २८३३

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/COVID-19-daily-report-12.03.21.pdf