सर्वात वर
AC Ad

Nashik : कोरोनाचे नियम न पाळल्याने दोन हॉटेल वर मनपा आयुक्तांनी केली कारवाई

बातमीच्या वर

नाशिक  (प्रतिनिधी) – नाशिक शहरात कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसत आहे.प्रशासनाने काही निर्बंध लागू केले आहे. काही ठिकाणी नियमांचे पालन होतांना दिसते तर काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. आज महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी नाशिक शहरातील  कॉलेज रोड वरील दोन हॉटेलमध्ये अचानक व्हिजिट केली या वेळी या दोन्हीही हॉटेल मध्ये  ५० टक्के पेक्षा जास्त ग्राहक असल्याने व सोशल डिस्टनसिंगचे पालन होत नसल्याने या दोन्ही हॉटेलवर पाच हजार रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई आयुक्त कैलास जाधव यांनी स्वतः केलेली आहे.

  नाशिक शहरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढलेला असून त्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या माध्यमातून  विविध उपाययोजना केल्या जात आहे.त्यातील एक भाग म्हणून नाशिक महानगरपालिका व नाशिक शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर मा.आयुक्त कैलास जाधव,पोलीस उपायुक्त अमोल तांबे, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे,मनपा व पोलीस विभागाचे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने कॉलेज रोड परिसरातील  हॉटेलची पाहणी केली असता त्यातील हॉटेल पकवान, जेहान सर्कल गंगापूर रोड व ग्रीन फिल्ड कृष्णा हॉटेल,कॉलेज रोड या दोन हॉटेलमध्ये सोशल डिस्टनसिंगचे पालन न होणे व आसन क्षमतेच्या ५० टक्के पेक्षा जास्त ग्राहक  असल्याचे  मा. आयुक्त कैलास जाधव यांच्या पाहणीच्या वेळी निदर्शनास आले.संबंधित हॉटेल व्यवसायीकांवर जागीच पाच हजार रुपयांचा दंड करून कार्यवाही करण्यात आली आहे.तसेच मास्क न वापरणाऱ्या वर देखील कार्यवाही करणेत आली आहे.सर्वांनी कोरोना बाबतचे नियम पाळण्याचे आवाहन मा.आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.

बातमीच्या मध्ये
Ac square