
Nashik : कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट,शहरात ८७ तर जिल्ह्यात ७४ कोरोनाचे नवे रुग्ण

२४ तासात १०४ कोरोना मुक्त तर ३५०संशयित दाखल : ४ जणांचा मृत्यू : जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.२५ %
नाशिक (प्रतिनिधी)आज नाशिक शहरात अनेक महिन्या नंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठया प्रमाणात घट दिसून आली आज शहरात इतक्या महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा शंभरच्या खाली आला आहे.आज शहरात ८७ तर ग्रामीण भागात ७४ कोरोनाचे रुग्ण आढळले आहे.कोरोनाचे रुग्ण कमी जरी झाले असले तरी कोरोनाचा धोका अद्याप टळला नसल्याचे प्रशासना कडून सांगण्यात आले आहे.नागरिकांनी मास्क घालावे आणि सोशल डिस्टंस पालन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. दिवसभरात कोरोनामुळे आज जिल्ह्यात ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२५ इतके झाले आहे तर शहरात हा रेट ९६.०३ टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासात १०४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. संध्याकाळी ६:०० वाजे पर्यंत जिल्ह्यात एकूण ३५० कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले. सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण २८६४ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १६५० जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात ८७,मालेगाव मध्ये ७,नाशिक ग्रामीण ६३ ,जिल्ह्या बाह्य ०४ रुग्ण आढळले आहेत.
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९३.८४,टक्के, नाशिक शहरात ९६.०३ टक्के, मालेगाव मध्ये ९३.१३ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.६९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.२५ इतके आहे.
आज शहराची स्थिती – नाशिक शहरात आज ८७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ५५८ क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ६३,७५३ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६१,२२२ जण कोरोना मुक्त झाले असून १६५० जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली.
कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती
१) मखमलाबाद,नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
२) सामन गांव,सिन्नर फाटा,नाशिक येथील ४२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०४
नाशिक महानगरपालिका-०२
मालेगाव महानगरपालिका-००
नाशिक ग्रामीण-०२
जिल्हा बाह्य-००
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १७१९
नाशिक शहरात एकूण मृत्यू – ८८१
आज नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित (सायंकाळी ६:०० वाजे पर्यंत)
१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ००
२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण -३१७
३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०३
४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०६
५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २४
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – ४३०
नाशिक जिल्हा / शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या (कृपया खालील लिंक वर क्लीक करा)
