सर्वात वर

नाशिक जिल्हाचा क्रिकेट संघ जाहीर,यशराज खाडे करणार नेतृत्व

१९ वर्षांखालील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या विभागीय क्रिकेट स्पर्धा  

नाशिक – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – एम सी ए – तर्फे , धुळे व शिरपूर येथे आयोजित १९ वर्षांखालील वयोगटातील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या विभागीय साखळी स्पर्धेसाठी, नाशिकचा जिल्हा क्रिकेट संघ (Nashik District Cricket Team) रवाना झाला आहे. नाशिकचा समावेश असलेल्या उत्तर विभागात धुळे, जळगाव व नंदुरबार हे इतर तीन संघ आहेत.

३ ते ६ मार्च दरम्यान  सदर संघांमध्ये, ५० षटकांचे एक दिवशीय साखळी सामने खेळविण्यात येणार आहेत.  नाशिकचा पहिला सामना ३ मार्च रोजी , धुळे संघाबरोबर धुळे येथे होणार आहे. त्यासाठी नाशिकचा जिल्हा क्रिकेट चा १४ जणांचा चमु संघ प्रशिक्षक व व्यवस्थापक शांताराम मेणे ह्यांचेसह , धुळे येथे रवाना झाला आहे.

नाशिक जिल्हा क्रिकेट निवड समितीचे तरुण गुप्ता, सतीश गायकवाड व शिवाजी जाधव ह्यांनी शनिवार २७ फेब्रुवारी पासुन विविध टप्प्यांत पार पडलेल्या निवड चाचणी प्रक्रियेनंतर सदर निवड घोषित केली.

नाशिकचा जिल्हा क्रिकेट चमु : (Nashik District Cricket Team)
यशराज खाडे – कर्णधार ,शर्विन किसवे, स्वप्नील शिंदे , सौरभ वाणी , ओम घाडगे, मुस्तांसिर कांचवाला,आदित्य लढ्ढा, रविंद्र मछ्या, गुरवीरसिंग सैनी, प्रतीक तिवारी , रितेश तिडके , ऋषिकेश कातकाडे,अभिषेक जंगम  व  गुरमानसिंग रेणु.