सर्वात वर

नाशिक जिल्हा अनलॉक तीन मधेच राहणार : जिल्ह्यातील निर्बंध कायम

रुग्ण संख्या कमी झाली तरी नाशिककरांना दिलासा नाहीच : मात्र विवाह सोहळ्या साठी परवानगी

नाशिक – नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधितांची रुग्ण कमी झाली असली तरी अद्याप नाशिक जिल्हा दुसऱ्या स्तरावर जाईल असे आकडे नसल्याने मागच्या आठवड्यात लागू केलेले निर्बंध कायम राहणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.त्यामुळे नाशिक जिल्हा अनलॉक(Unlock) तीन मधेच राहणार आहे. ते पुढे म्हणाले मागच्या आठवड्या प्रमाणे निर्बध जरी कायम असले तरी मंगल कार्यालये आणि लॉन्स यांना शनिवार आणि रविवारी दुपारी ४ वाजे पर्यंत ५० व्यक्तींसाठीच्या विवाह सोहळ्या साठी परवानगी देण्यात आली आहे.

सर्व नियम मागच्या वेळी जसे लागू केले असून या आढवड्यात हि शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

काय आहे नियमावली जाणून घ्या