सर्वात वर

Nashik : शनिवार आणि रविवारच्या बंद बाबत जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वाचे स्पष्टीकरण

नाशिक – नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होते आहे.वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठांसह दुकाने ,मॉल्स,शोरूम बंद राहणार आहेत, काल पासून नाशिक मध्ये निर्बंध लागू झाले असून तरीही अनेक नागरिकांना  या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.

 
आपल्या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने सांगितले आहे की हॉटेल आणि परमिटरूमलाच ५० टक्क्यांच्या क्षमतेने  सकाळी ७ ते ९ वाजे पर्यंत परवानगी असणार आहे त्याचप्रमाणे  हॉटेल आणि परमिटरूम शनिवार आणि रविवारी हि सकाळी ७ ते ९ या वेळात सुरु राहणार आहे. 


इतर कोणत्याही खाद्य स्थळांना ही मुभा असणार नाही. परवाना असलेले हातगाडी,ठेले,स्टॉल,फूड जॉईन्ट व तत्सम ठिकाणे इतर दुकानांप्रमाणे सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजे पर्यंत कोविड -१९ चे मार्गदर्शक तत्वांचे यथोचित पालन करून सुरु राहतील व प्रत्येक शनिवार आणि रविवार या दिवशी पूर्णपणे बंद राहतील. या नियमांचे उल्लंघन झाल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे. 

त्याचप्रमाणे चिकन ,मटण , अंडी विक्री दुकाने हे सर्व अन्नपदार्थ असल्यामुळे जीवनावश्यक या प्रवर्गात मोडतात त्यामुळे ती केव्हाही सुरु राहू शकतात असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी कळवले आहे. 


जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण