सर्वात वर

Nashik : २३ मे नंतरच्या निर्बंधांबाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या महत्वाच्या सूचना

नाशिक – नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा बसावा म्हणून जिल्हा प्रशासनाने १२ मे पासून नाशिक जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू केले होते त्या बाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे(Suraj Mandhare) यांनी नाशिककरांसाठी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत 

नाशिक शहर व जिल्ह्यातील रुग्ण संख्या विचारात घेता आपण दिनांक १२ मे पासून काही निर्बंध कठोर केले होते. त्यानंतर रुग्ण संख्या चांगल्यापैकी नियंत्रणात आलेली आहे. त्यामुळे आपण स्थानिक स्तरावर कठोर केलेले निर्बंध दिनांक २३ मे रात्री बारा वाजल्यापासून शिथिल करत आहोत. 

परंतु याचा अर्थ लॉक डाऊन पूर्ण उठला आहे असे नाही. 

आपल्या जिल्ह्यात जे निर्बंध दिनांक १२ मे पूर्वी राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार लागू होते ते निर्बंध तसेच पुढे चालू राहणार आहेत व त्याआधी सूचनेची प्रभावी अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर केली जाणार आहे. 

त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातून पूर्ण लॉक डाऊन उठला आहे अशा गैरसमजात कोणी राहू नये. सर्वांनी पूर्वीच्या सर्व निर्बंधांचे यथोचित पालन करावे. 

आपण मोठ्या प्रयासाने रुग्ण संख्या कमी केली आहे. परंतु आता पुन्हा निर्बंधांचे उल्लंघन केल्यास ती वाढायला वेळ लागणार नाही याची जाणीव ठेवून सर्वांनी निर्बंधांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी केले आहे.