सर्वात वर

BREAKING:कॉलेजरोड परिसरात बिबट्या शिरला:घरकाम करणाऱ्या महिलेवर हल्ला

बातमीच्या वर

नाशिक-शहरातील कॉलेज रोड परिसरात बिबट्या शिरला असून बी वाय के कॉलेज जवळील  येवलेकर मळा परिसरात हा बिबट्या असल्याची प्रार्थमिक माहिती हाती आली असून याच परिसरात घरकाम करणाऱ्या एका महिलेवर त्याने हल्ला (Leopard Attack)केल्याची माहिती समोर आली असून त्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते आहे,

कॉलेजरोडवरील श्रद्धा पेट्रोलपंपासमोरील रस्त्यावरील शिवम् कलेक्शन परिसरात सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पायी जाणार्‍या ४५ वर्षीय महिलेवर हल्ला केला, त्यानंतर त्याने धूम ठोकली. या जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, , अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी दिली. एका व्यक्तीने बिबट्याला इमारतीजवळून उडी मारताना बघितल्याचे त्यांनी सांगितले.वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून शोधकार्य सुरु आहे. 

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली