सर्वात वर

Nashik : मनपा आयुक्त कैलास जाधव साधणार नाशिककरांशी संवाद

नाशिक – कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.त्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची पूर्व तयारी आणि पावसाळ्यापूर्वी काय काळजी घ्यायला हवी या  विषयी नाशिक महानगर पालिका आयुक्त कैलास जाधव (Municipal Commissioner Kailas Jadhav) उद्या दिनांक १० जून रोजी सायंकाळी ७ वाजता  फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नाशिककरांशी संवाद साधणार आहेत. 

सायंकाळी ७ वाजता ( https://www.facebook.com/mynashikmc ) या लिंक वर नाशिककर आपल्या  नाशिक शहरातील कोरोना बाबत काही प्रश्न/सूचना असतील तर आपण नकीच विचारु शकता व जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.