सर्वात वर

Nashik : नियम न पाळणाऱ्या हॉटेल चालक व दुकानदारांवर मनपा आयुक्तांची कारवाई

सलग दुसऱ्या दिवशी अचानक भेट देऊन आयुक्त(Municipal Commissioner) कैलास जाधव यांनी केली ३० जणांवर कारवाई 

नाशिक – नाशिक मध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही काही जण नियमांचे उल्लंघन करतांना दिसत आहे. शासनाच्या निर्देशानुसार नियमांचे पालन करणे आवश्यक असतांना तसेच हॉटेल ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याचे बंधन असतांना काही हॉटेल मात्र नियमांचे सर्रास उल्लंघन करतांना दिसल्या नंतर मनपा आयुक्त कैलास जाधव (Municipal Commissioner) यांनी स्वतः रस्त्यावर उतरून  हॉटेल,भाजी मार्केट व मेडिकल दुकानांना अचानक भेट देऊन नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

शनिवार आयुक्त कैलास जाधव (Municipal Commissioner) यांनी कॉलेज रोड वरील  दोन हॉटेलला अचानक भेट देऊन त्याच्यावर कारवाई केली होती. काल रविवारी रात्री सलग दुसऱ्या दिवशी आयुक्तांनी नवीन नाशिक विभागातील हॉटेल,भाजी मार्केट व मेडिकल दुकानांना अचानक भेटी देऊन नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

नवीन नाशिक परिसरातील शिवाजी चौक, लेखा नगर,राणे नगर परिसरातील भाजी मार्केट व आदी भागाची पाहणी केली. यावेळी मास्क परिधान करणे बाबतचे नियम न पाळल्याबद्दल ३० जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच परिसरातील औषध विक्रेते व्यावसायिकांशी चर्चा करून ताप थंडी सारख्या आजारा बाबतची  औषधे रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय विक्री करू नये अशा स्पष्ट सूचना यावेळी मा.आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या.

तसेच नवीन नाशिक परिसरातील हॉटेल स्पेक लेखानगर,हॉटेल उत्तम हिरा चावडी, लेखानगर व हॉटेल सचिन,लेखानगर या तीन हॉटेलमध्ये कोरोना बाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी प्रत्येकी पाच हजार रुपये दंड करण्यात आला आहे.या पाहणीच्या वेळी मा.आयुक्त कैलास जाधव यांच्या समवेत घनकचरा व्यवस्थापन संचालिका डॉ.कल्पना कुटे, विभागीय अधिकारी मयुर पाटील, अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंबाळकर आदी उपस्थित होते.

मनपा आयुक्तांनी (Municipal Commissioner) राबलेल्या या मोहिमेचे शहर परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.