सर्वात वर

Nashik : स्थायी समितीच्या नवीन सदस्यांची नावे जाहीर

नाशिक – नाशिक महानगर पालिकेच्या (Nashik Municipal Corporation) स्थायी समितीच्या नवनियुक्त सदस्यांची नावे जाहीर झाली असून महापौर सतीश कुलकर्णी यांनी आज विशेष महासभेत या सदस्यांच्या नावाची घोषणा केली आहे. या नूतन सदस्यांमध्ये भाजपा चे ८ शिवसेनेचे ३ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका सदस्याचा समावेश करण्यात आला आहे.स्थायी समितीचे विद्यमान सभापती गणेश गीते यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. 

स्थायी समितीच्या सदस्यांची नावे

भाजपा 

गणेश गीते, इंदुमती नागरे, प्रतिभा पवार, माधुरी बोलकर, योगेश हिरे, हिमगौरी हिमगौरी आडके , मुकेश शहाणे,रंजना भानसी 

शिवसेना 

ज्योती खोले, रत्नमाला राणे, केशव पोरजे ,सुधाकर बडगुजर,सत्यभामा गाडेकर 

मनसे 

सलीम शेख 

काँग्रेस 

राहुल दिवे 

राष्ट्रवादी 

समीना मेमन