सर्वात वर

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सर्व शाळा १५ मार्च पर्यंत बंद

नाशिक – नाशिक शहरात वाढता कोरोनाचा प्रभाव आणि नाशिक शहरातील दोन शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना झालेली कोरोनाची लागण या पार्श्वभूमीवर नाशिक महानगर पालिका (Nashik Municipal Corporation) क्षेत्रातील सर्व शाळा मधील ५ वी ते ९ वी आणि ११ वी चे वर्ग १५ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक महानगर पालिकेने (Nashik Municipal Corporation) घेतला असून या बाबतचे आदेश महानगर पालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहे. 

नाशिक शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढतो आहे. शहरातील ५ वी ते १० वी च्या शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी भोसला शाळेतील तर काल अजून एका शाळेतील विद्यार्थांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले.त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. १० वी आणि १२ वीच्या संभाव्य परीक्षा लक्षात घेता.इंग्रजी,गणित आणि विज्ञान यांचे वर्ग सुरु राहणार असून या वर्गासाठी पालकांची परवानगी आवश्यक असणार आहे. 
शाळा जरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी ऑनलाईन वर्ग सुरूच राहणार असल्याचे आयुक्त  कैलास जाधव यांनी म्हंटले आहे.