सर्वात वर

सोमवारी होणाऱ्या लसीकरणाबाबत नाशिक महापालिकेचे निवेदन

नाशिक महानगर पालिका हद्दीत उद्या सोमवारी कोणाला करता येणार लसीकरण

नाशिक – नाशिक महानगर पालिका (Nashik Municipal Corporation) क्षेत्रात उद्या सोमवार दिनांक १० मे २०२१ रोजी  १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण (Vaccination) चालू राहणार असून ज्या नागरीकांनी लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे.त्याच नागरीकांनी निश्चित केलेल्या वेळेतच लसीकरण केंद्रावर लस मिळणारआहे.ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली नसेल अशा नागरीकांना लस मिळणार नसल्याने त्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन महापालिकेतर्फे (Nashik Municipal Corporation) करण्यात आले आहे. 

सोमवार दि :१०-०५-२०२१  रोजी मनपा हद्दीतील 45+ वयोगटातील लसीकरण बंद राहणार !

त्याचप्रमाणे उद्या ४५ वर्षावरील नागरीकांसाठी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण (Vaccination)बंद राहणारअसून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये.लस उपलब्ध झाल्यानंतर त्या संदर्भात कळविण्यात येईल.असे आवाहन नाशिक महानगर पालिके तर्फे करण्यात आले आहे.