सर्वात वर

Nashik News : भाजपा नेते सुनील बागुल व वसंत गीते यांचा शिवसेनेत प्रवेश

नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपाला दे – धक्का 

नाशिक- (Nashik News)भाजपा नेते माजी शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील बागुल व माजी आमदार वसंत गीते यांनी आज खा संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आज सायंकाळी हे दोन्ही नेते मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. 

(Nashik News) नाशिक महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मोठे खिंडार पडले आहे या दिग्गज नेत्यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.दोघांच्या प्रवेशा नंतर पत्रकारांशी बोलतांना खा. राऊत म्हणाले नाशिक हा पुन्हा एकदा शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला बनावा याची जबाबदारी या दोन्ही नेत्यांची असणार आहे. मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्यावतीनं या दोघांचं शिवसेनेच्या परिवारात मनापासून स्वागत करतो आहे .नाशिकमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचं मनापासून स्वागत केलं आहे.”आता प्रवाह बदलतो आहे. नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच असणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.