सर्वात वर

Nashik News : कॅडन्स अकादमीचे शानदार उद्घाटन

नाशिक (Nashik News)  कॅडन्स अकादमी या भारतातील सर्वोत्तम फॅशन आणि इंटीरियर इंस्टीट्यूशन म्हणून सन २०१९ चा आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार प्राप्त झालेल्या संस्थेच्या नाशिक केंद्राचे उदघाटन आज रविवार दि.२४ जानेवारी रोजी दूरचित्रवाणी सेलिब्रिटी अभिषेक निगम यांच्या हस्ते झाले. शरणपूर रोड, कॅनडा कॉर्नर वरील विराज अपार्टमेंट पहिला मजला फ्लॅट नं १३/१४ येथे हा सोहळा संपन्न झाला. 

नाशिक मध्ये आता  फॅशन व अन्य अभ्यासक्रम सोमवार दिनांक २५ जानेवारी पासून सुरू होत आहेत. यातील डिप्लोमासाठी दहावी तर डिग्री आणि एड्व्हांस डिप्लोमासाठी बारावी पास ही पात्रता लागणार आहे. अन्य संस्थांपेक्षा या संस्थेचे शिक्षणशुल्क माफक असून सोयिस्कर हप्त्यात भरण्याची सुविधा आहे. तसेच त्यात युनिफॉर्म, पुस्तके,शैक्षणिक साहित्य देखील देण्यात येणार आहे. हिमालया युनिव्हार्सिटीशी संस्थेची औद्योगिक प्रशिक्षण भागीदारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होईल.अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार (आयक्यूए)उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील गुणवत्ता सुधारणा प्रोत्साहित करण्यासाठी ब्रान्ड्स इंपॅक्टद्वारे देण्यात येतो. यावेळी प्रमुख  पाहुणे अभिषेक निगम (अभिनेता) व  रुपेश कुमार (कॅडन्स अकादमीचे व्यवस्थापकीय संचालक) आणि केंद्र संचालक  तपोश कांचन आणि  उदय शिंदे ,अंजली काबरा आदि उपस्थित होते. २ दशकांपासून कॅडन्स अकादमी ऑफ डिझाईन प्रा. लिमिटेड फॅशन आणि इंटीरियर डिझायनिंग कोर्समध्ये शैक्षणिक सेवा प्रदान करत आहे आणि सध्या मध्य भारतातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन आणि इंटीरियर संस्था आहे. दोन दशके विस्तृत संशोधन करून विचारपूर्वक विकसित केलेला संपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना स्टार्टअप किटच्या रूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मानकांच्या बरोबरीने स्वत:ला अपडेटेड ठेवण्यासाठी, कॅडेंस प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय टूर आयोजित करते. प्रशिक्षण पद्धती, साइट भेटी, प्रदर्शने, व्यावसायिक सेमिनार, सेलिब्रिटी भेटी आणि फॅशन शो च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलेली शैक्षणिक गुणवत्ता हि उत्कृष्ट व उच्च दर्जाची असून ते अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे सर्व बाजूंनी विद्यार्थ्यांना समृद्ध करण्यात येते. संस्थेचे मुख्यालय नागपुर येथे धर्मपेठ येथे असून नाशिकची शाखा ही २५ वी शाखा आहे. राज्यात अन्य ठिकाणी देखील शिक्षण सुविधा उपलब्ध आहे.     

कॅडन्स अकादमी ऑफ डिझाईनने एक मोबाईल अॅप विकसित केले आहे ज्याद्वारे ईआरपी सपोर्टशिवाय, इंटर्नशिप साधक आणि नोकरीच्या इच्छुकांना रिक्रूटर्सबरोबर थेट कनेक्ट केले जाईल त्यामुळे सहजतेने रोजगार उपलब्ध होईल.(Nashik News)