सर्वात वर

Nashik News : बर्ड फ्लू आजाराला नागरिकांनी घाबरून जाऊ नये – कैलास जाधव

Nashik News : मृत पक्षी आढळल्यास महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाला संपर्क साधावा 

नाशिक –(Nashik News)अनेक राज्यात बर्ड फ्लूचे सावट जरी असले तरी बर्ड फ्लू आजाराला नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच शहर व परिसरातील पोल्ट्री अथवा कुकुट्ट पालन करणाऱ्यांनी त्यांच्या पक्षांमध्ये मरगळ आढळल्यास मनपाच्या संपर्क क्रमांकावर संपर्क करून पशुसंवर्धन विभागास कळविण्याचे आवाहन नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.

सध्या बर्ड फ्लू च्या अनुषंगाने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसून त्याबाबत काळजी घेणे हे जास्त महत्त्वाचे आहे. नागरिकांनी याबाबत घाबरून न जाता पक्षी स्त्रावा सोबत संपर्क टाळावा, तसेच  पक्षी,कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाद्य दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने धुवावीत.शिल्लक उरलेल्या मासाची योग्य ती विल्हेवाट लावावी, 

एखादा पक्षी मरण पावला तर या पक्षांना उघड्या हाताने स्पर्श करू नये व त्याबाबत मनपाच्या पशुसंवर्धन विभागास त्याबाबतची माहिती ताबडतोब कळवावी. कच्च्या पोल्ट्री उत्पादना सोबत काम करताना हात पाणी व साबणाने वारंवार धुवावेत व्यक्तिगत स्वच्छता राखावी,तसेच परिसरही स्वच्छ ठेवावा,असे हि बोलतांना मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. 

चिकन उत्पादनासोबत काम करताना व मास्क व ग्लोजचा वापर करावा, पूर्ण शिजवलेल्या (१०० डिग्री सेल्सिअस)मांसांचाच खाण्यात वापर करावा. आपल्या परिसरात असणाऱ्या तलाव अथवा नदी नाल्यांमध्ये पक्षी येत असतील तर त्या ठिकाणी सुयोग्य प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी पशुसंवर्धन विभागात कळविण्यात यावे.हे करत असताना नागरिकांनी कच्चे चिकन अथवा कच्ची अंडी खाऊ नये, अर्धवट शिजलेले चिकन अथवा पक्षी,अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नये,आजारी दिसणाऱ्या सुस्त पडलेल्या पक्षांच्या संपर्कात येऊ नये. 

पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नये.एखाद्या परिसरात मृत पक्षी आढळल्यास त्याबाबत मनपाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने नमूद केलेल्या या ०२५३-२३१७२९२ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करून  माहिती कळवावी असे आवाहन नाशिक .मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.(Nashik News)