सर्वात वर

Nashik News : दातार जनेटीक्स करणार सवलतीच्या दरात करोना तपासणी

नाशिक – (Nashik News) करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या दृष्टिने नाशिक शहरात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या तंत्रज्ञाची दातार जनेटीक्सच्या वतीने सवलतीच्या दरात तपासणी केली जाणार आहे. अशी माहिती लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगांवकर यांनी दिली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या दृष्टिने त्यामुळे शहरात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी व्हावी यासाठी दातार जनेटीक्सने पुढाकार घेतला आहे.आज राजन दातार हयांची लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगांवकर ,सुभाष पाटिल,डॉ.शंकर बोर्हाड़े संजय करंजकर यांनी भेट घेतली. 

 साहित्य संमेलनासाठी येत्या काळात जे काही तंत्रज्ञ, कामगार संमेलन स्थळी काम करतील त्याची सवलतीच्या दरात तपासणी होणार असल्याची माहीत लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली.त्याच प्रमाणे ज्या कुणाला या ठिकाणी तपासणी करायाची असेल ती देखील करुन दिली जाणार आहे.त्याच प्रमाणे साहित्य संमेलनास योग्य ती मदत करण्याचे आश्वासन  राजन दातार यांनी दिले आहे. (Nashik News)

समीर भुजबळ यांच्याकडून संमेलनाच्या जागेची पाहणी

दरम्यान नाशिक मध्ये होण्याऱ्या साहित्य संमेलनाची तयारी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी खासदार समीर भुजबळ यांनी कॉलेजरोड येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या परिसरा मधील नियोजित जागेची पाहणी करून संमेलनाबाबत माहिती घेतली.यावेळी लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, सुभाष पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, प्राचार्य व्ही.एन.सूर्यवंशी आदी उपस्थित होते.यावेळी त्यांनी साहीत्य संमेलनाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.