सर्वात वर

Nashik News : नाशिक महानगरपालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार

बातमीच्या वर

Nashik News Update : दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करा भुजबळांचे प्रशासनाला आदेश

नाशिक (प्रतिनिधी)- (Nashik News) नाशिक महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा ७ व्या वेतन आयोग दिवाळीपूर्वी लागू करा असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

मनपाचे एका शिष्टमंडळाने आज मंत्रालयात जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेवून त्यांना वेतन आयोगात वस्तुस्थिती नमूद केली व पिंपरी चिंचवड मनपाच्या धर्तीवर नाशिक महानगरपालिकेला देखील वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली. 

मनपा शिष्टमंडळाच्या निवेदनाचा स्वीकार करुन छगन भुजबळ यांनी वस्तुस्थितीचा व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आदेशाचा अभ्यास करुन तात्काळ वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिनांक १४ ऑक्टोंबरच्या शासन आदेशानुसार ३० दिवसांच्या आत म्हणजेच दिवाळीपूर्वी १४ नोव्हेंबर पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या धर्तीवर वेतन निश्चिती करुन त्याचा अहवाल शासनाकडे सादर करणेचे आदेश दिले व मनपा कर्मचाऱ्यांचे कुठल्याही प्रकारचे आर्थिक नुकसान होवू नये यासाठी आपण प्रयत्नशील रहाणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली