सर्वात वर

Nashik News : दर सोमवारी महापौर सतीश कुलकर्णी साधणार जनतेशी संवाद

बातमीच्या वर

नाशिक : (Nashik News) सोमवार दिनांक २ नोव्हेंबर पासून दर सोमवारी नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारीआणि कार्यकर्ते नाशिककर जनतेशी संवाद साधून नागरिकांच्या समस्या सोडविणार आहेत. २ नोव्हेंबर  २०२० पासून सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत भाजप कार्यालय वसंतस्मृती येथून महापौर जनतेशी साधणार संवाद साधतील अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी दिली आहे. 

शहराध्यक्ष  गिरीश पालवे यांनी नुकतीच महापौर सतिश कुलकर्णी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आठवड्यातुन एकदा भाजप कार्यालयातून पदाधिकारी व कार्यकर्ते व जनतेशी संवाद  साधावा अशी विनंती केली होती. त्यांच्या या विनंतीवरून महापौर सतीश कुलकर्णी  यांनी दर सोमवारी भाजप कार्यालयातुन जनतेशी सवांद साधणार असल्याचे गिरीश पालचे यांनी सांगितले.

जनतेच्या विविध समस्या व गाऱ्हाणे  ऐकण्यासाठी व सोडविण्यासाठी  जनतेला वेळ देता यावा म्हणून  महापौर सतीश कुलकर्णी यांनी आपल्या  विनंतीनुसार हा निर्णय  घेतल्याचे भाजप शहर अध्यक्ष गिरीश पालवे यांनी सांगितले. 

या निर्णयाचे स्वागत प्रदेश सरचिटणीस  आमदार देवयानी फरांदे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले,   भाजप जेष्ठ नेते विजय साने, सुनील बागुल, वसंत गीते, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव,पवन भगूरकर, सुनील केदार, जगन अण्णा पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष  मनीष  बागुल, महिला मोर्चा अध्यक्षा हिमगौरी आडके तसेच सर्व मंडल अध्यक्ष व आघाड्यांचे संयोजक, शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

तरी ज्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना आपल्या समस्या महापौरांकडे मांडायच्या असतील त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे शहर अध्यक्ष गिरीश पालवे  यांनी म्हटले आहे.

(Nashik News) येत्या सोमवार दिनांक २ नोव्हेंबर  २०२० पासून सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत दर सोमवारी महापौर सतीश कुलकर्णी, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेशी सवांद  साधणार आहेत अशी माहिती भाजप शहर अध्यक्ष गिरीश पालवे  यांनी दिली. 

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली