सर्वात वर

Nashik News : नाशिकमध्ये फटाके फोडण्यास बंदी

बातमीच्या वर

Nashik News : कंटेन्मेंट झोन परिसरात फटाके फोडल्यास कारवाई :“No mask no entry” हा नियम सर्व सार्वजनिक ठिकाणी लागू 

नाशिक- (Nashik News)राज्यातील कोरोनाचे संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयांत नियंत्रित होत असलेल्या कोरोनाच्या संसर्गात वाढ होऊ नये या साठी नाशिक मध्ये  फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.येत्या १० नोव्हेंबरच्या रात्री १२.०० वाजे  पासून हा बंदीचा आदेश लागू होणार असून वायू प्रदूषण करणारे कोणतेही प्रकारचे फटाके कंटेमेंट झोन तसेच पूर्व घोषित शांतता क्षेत्रात आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजण्यास  पुढील आदेशा पर्यंत पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे. 

त्याचप्रमाणे “No mask no entry” हा नियम सर्व सार्वजनिक ठिकाणी अनिवार्य करण्यात येत आहे. covid-19 प्रतिबंधक विविध उपाय योजनांच्या नियोजनाच्या दृष्टीने प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत इतर सर्व सदस्य मा पोलीस आयुक्त, मा मनपा आयुक्त मा पोलीस अधीक्षक मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उपस्थित होते. 

नाशिक (Nashik News) शहरात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144(1) (3) मनाई आदेश लागू असल्याने आठवडे बाजार ( जनावरे विक्री सह) सुरु करणे संदर्भात चर्चा करणेत आली. आठवडे बाजार जनावरे विक्री सह सुरु करणेत येत आहे. परंतु या बाजाराचे कामकाज करीत असताना कोविड 19 संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने यापूर्वी देण्यात आलेल्या सर्व सूचना जसे मास्कचा वापर, सामाजिक आंतर इत्यादी चा अवलंब करणे संबंधितांवर बंधनकारक राहील असे आदेशात म्हटले आहे.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली